भल्लगडी दादा
हे आली रे आली, आली रे आली
सुगी आली sss
मेघराजाने कृपा केली रं
हे भलागडी दादा , भल म्हण दादा ।।
भावार्थ :
सदर ओळी कविता “भल्ल गडी
दादा” मधून घेतलेली आहे. कवीने कवितेत मनोहारी शब्दचित्र
रेखाटले आहे. या ओळीत कवी म्हणतो की, आनंदाची वेळ आली आहे. सुख, समाधान घेऊन ही वेळ आली आहे. मेघराजा म्हणजे पावसाने कृपा केली आहे. शेतकरी बंधुंसाठी हा पाऊस खूप चांगला, मंगल आणि सुख देणारा आहे असे कवी सांगतो.
-------------------------------------------------------------------
काळ्या मातीला हिरवा सुगंध
या गंधात सारेच धुंद
नवनवतीचा साज हा ल्याली रे ।।
*भावार्थ:*
पावसामुळे काळी जमीन
ओलसर होऊन तिला हिरव्या जीवनाचा सुगंध येतो, म्हणजे शेत पिकाने फुललेले आहे. त्या
सुगंधात सगळं निसर्गमंडळ, व शेतकरी आनंदात बुडालं आहे. निसर्ग नव्या वधूप्रमाणे सजून उठतो
आहे.
--------------------------------------------------------------------
नटले घररदार शिवार सारं
खेंळे अंगणी सळसळतं वारं
बहुआनंदाने धरती न्हाली रे ।।
*भावार्थ:*
संपूर्ण शिवार (शेती, शेतजमीन) सुंदर दिसू लागली आहे. अंगणात वारा खेळतो आहे, वातावरणात चैतन्य आहे. पृथ्वी अनेक रंगांनी न्हाऊन निघाली
आहे,
म्हणजे निसर्ग खूप सुंदर दिसतो आहे.
--------------------------------------------------------------------
इस कविता के भावार्थ को विडियो के माध्यम से भी समझो 👇
साथीला बैल माझे खिल्लारी
केली देवाने दौलत हवालि रे ।।
भावार्थ:
ही सगळी समृद्धी शेतकऱ्याच्या कष्टामुळे आहे. त्याच्या
मेहनतीला बैलांची साथ आहे. देवाने शेतकऱ्याच्या हातात संपत्ती आणि समृद्धी दिली
आहे,
असे कवी सांगतो.
-----------------------------------------------------------------------
काय कमतरता कोणाला आज
धानी आम्हीच आमचे हे राज
सान थोरांची चांगळं उडाली रे ।।
भावार्थ:
आता कुणालाही काहीच कमी नाही. आम्ही शेतकरी स्वतःचेच राजे आहोत, आम्ही स्वावलंबी आहोत. लहान–मोठे सगळे आनंदात आहेत
आणि उत्सव,
आनंद साजरा होत आहे.


1 comment:
Very good 👍👍👍
Post a Comment