माझा आवडता प्राणी
(मेरा पसंदीदा जानवर)
माझा आवडता प्राणी आहे बकरी. आम्ही नेहमी बकऱ्या पाळतो. लहानपणापासूनच बकरी हा प्राणी मी पाहत आहे. बकऱ्यांबरोबर मी खूप खेळलो आहे. आम्ही घरात बकरीचे दूध वापरतो. मी रोज बकरीचे दूध पितो. म्हणून मी बकरीच्या पिलासारखा धावू शकतो. (Click On "आगे पढ़ें")💥
मी शाळेत धावण्याच्या शर्यतीत नेहमी पारितोषिक मिळवतो. आमच्या घरी अनेक बकऱ्या आहेत. त्यांपैकी पांढरी बकरी मला फार आवडते. मी तिच्याशी खूप खेळतो. पकडापकडी करतो. रविवारी मी आमच्या बकऱ्यांना रानात नेतो. बकऱ्या रानात उंच उंच डोंगरावर जातात.
माझी आवडती बकरी तर अवघड ठिकाणीसुद्धा सहज जाते. मलाच त्याची कधी कधी भीती वाटते. मी जेवायला बसलो की, माझ्या बाजूला माझी आवडती बकरी बसते. मी चपाती दिली, तर ती आनंदाने खाते. मी अभ्यास करतानाही कधी माझ्या बाजूला बसते. लहान बाळ जसे अंगाला बिलगते, तसे ती मला नेहमी बिलगते. प्रेमाने ब्यां ब्यां करते. मला ती खूप खूप आवडते.
No comments:
Post a Comment
आपको यह पोस्ट कैसी लगी कमेन्ट जरूर करें।