मी क्रीडांगण बोलत आहे/ क्रीडांगणाची आत्मकथा/ मैं खेल का मैदान बोल रहा हूँ : मराठी निबंध

मी क्रीडांगण बोलतो .....
क्रीडांगण : आत्मकथा 


मी क्रीडांगण बोलत आहे...
        अरे बाळा! ऐक मी क्रीडांगण बोलतेय! थोड्याच वेळात तुमच्या स्पर्धा सुरू होतील. तुम्ही आनंदाने माझ्या अंगावर हुंदडाल. तुम्ही मुले माझ्या खांदयावर उड्या मारत मोठे झाले. मी तुमचं बालपण पाहतो तेव्हा मला खूप आनंद होतो.तुम्ही जेव्हा माझ्या अंगावर विविध खेळांचा सराव करता तेव्हा माझी पाठ खूप दुखते.
(Click On "आगे पढ़ें")👇

    माझे संपूर्ण शरीर दुखू लागते. पण मला याचे मुळीच दुःख होत नाही. कारण माझे अस्तित्वच मुळी तुमच्यासाठीच आहे. तुमच्या मजबूत शरीरासाठी माझे असणे फार महत्त्वाचे आहे. माझ्यामुळेच तुम्हांला अनेक मैदानी खेळ खेळणे शक्य होते; त्यामुळे तुमचे शरीर लवचीक बनते. आरोग्य चांगले राहते. ‘निरोगी शरीरात निरोगी मन वसत असते. ' पूर्वी शाळा सुटली की तुम्ही मुलं माझ्या भेटीला यायचा.

 दिवाळीची सुट्टी असो व उन्हाळ्याची; माझ्यासोबत दिवसभर तुमचा दंगा सुरू असायचा. माझेही आता वय झाले आहे. माझ्यातले चैतन्य आता कमी होत आहे. सकाळी पुन्हा माझे कान तुम्हा मुलांचा किलबिलाट ऐकण्यासाठी उत्सुक होतात. तुमचे खेळ बघण्यासाठी, तुमच्या आनंदासाठी मी सज्ज होतो. बाळांनो! निरोगी आरोग्य हे स्वतःलाच कमवावे लागते. त्यासाठी मैदानी खेळ निश्चितच मदत करतील. मी तुमच्या सुखासाठी सदैव तुमच्यासोबत आहे. असे बोलता
बोलता आवाज बंद झाला होता.