मराठी निबंध लेखन : आम्ही केलेले श्रमदान


पुढील कोणत्याही एका विषयावर निबंध लेखन करा.
१) मी केलेले श्रमदान
२) श्रमदान श्रेष्ठ दान 

"आम्ही केलेले श्रमदान"

    मी आणि माझ्या मित्रवर्गाने समाजकल्याणाच्या आणि श्रमदान हेतूने शाळेचे मैदान तयार करणे व अस्वच्छ मैदान स्वच्छ करण्याचे ठरवले. शाळेत खेळण्यासाठी मैदान नाहीसे होते. शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्याचा आनंद मिळत नव्हता.

👇

    आम्ही सगळ्यांनी सर्वप्रथम मैदान समिती गठीत केली. तसेच समाजसेवकांकडून मिळणारी देणगी आणि टोपले, फावडे इ. वस्तूंचे जमा केले. मी आणि माझ्या मित्रांनी जवळपास प्रत्येकी दोन-दोन वस्तू समान गोळा केले होते.त्यानंतर आम्ही मैदानसाठी लागणारी जागा सफाईसाठी वाटून घेतली.

    अशाप्रकारे मी आणि माझ्या मित्रवर्गाने जवळपास पाच - सहा दिवसांमध्ये दिवसरात्र मेहनत करून सुमारे १ एकड जागा मैदानात रुपांतर केली. हे कार्य करताना मनात एक वेगळाच उत्साह आणि समाधान होते. आपल्यामुळे विद्यार्थांचे आनद जपून राहील ही कल्पनासुद्धा अधिक श्रम करण्यास बळ देत होती. मनात आनंदाचे लाटा उसळत होत्या.

    "श्रमदान हेच श्रेष्ठ दान" असे म्हटले जाते. अर्थात श्रमदान हे कोणत्याही प्रकारचे असो त्यांतील समाजकल्याणाची भावना अतिशय महत्वाची असते. विनामोबदला इतरांच्या सुखासाठी स्वतः केलेले परिश्रम हेच सर्वश्रेष्ठ मानले जाते.