हा देश माझा भावार्थ व सरळ अर्थ /Ha Desh Maajha Explanation, words Meaning, Bhavarth.
हा देश माझा याचे, भान जरासे राहू दया रे ।।धृ।।
हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा.
भावार्थ :
दिलेल्या ओळींमध्ये कवी सांगतो कि हा माझा भारत देश आहे, याची मनोमन जाणीव जराशी राहू दे. हा सर्वांत उंच असलेला हिमालय माझा आहे. हा अथांग सागर माझा आहे. माझ्या देशा सुजलाम्-सुफलाम् करणाऱ्या गंगा-यमुना या पवित्र नदया माझ्या आहेत. ही भूमी, त्यावरची शेती सदाबहार फुलणारा बागबगीचा माझा आहे.
💧💧
अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता
या मरण दयावया, स्फुरण आपल्या बाहू पावू दया रे ॥१॥
भावार्थ :
या माझ्या प्रिय मातृभूमीची अभिलाषा कुण्या परक्याच्या मनात जरी आली, वाकडा डोळा जर कुणी तिच्यावर केला, कुणी आक्रमण करण्याचे धाडस केले तर त्यांना मृत्यू देण्यासाठी सर्व भारतीयांचे बाहू तयार आहेत. मातृभूमी रक्षण करायला तिचे सुपुत्र समर्थ आहेत.
💙💙
जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
भावार्थ :
मातृभूमीवर दगडांची कठोर बरसातकरायला आतुरलेल्या हातांना अडवा, मातृभूमीवर हल्ला करणाऱ्या नराधमांना रोखा, तेच हात या देशकार्याला लावूया. या देशाच्या प्रगतीला जुंपूया.
💧💧
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ दया रे ।।२।।
भावार्थ :
अनाठायी विघातक अनर्थ होईल त्या गोष्टी बंद करा. दंगली बंद करा, देशवासीयांचा घात थांबवा. विघातक गोष्टींमध्ये आपली शक्ती फुकट न जाता, वाया न जाता, आपल्या समार्थ्याला योग्य अर्थ, योग्य दिशा दया.
💛💛
जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जातीती
परी अभंग असू दया, सदैव अपुली माणसुकीची नाती
भावार्थ :
आपण अनेक धर्माचे, जातीचे लोक इथे या भूमीवर नांदत आहोत. पण आपले माणुसकीचे नाते, आपला सर्वधर्मसमभाव नेहमी अभंग, अतूट राहू दे.
💧💧
दया सर्व दूर ललकारी, फुंकारे एक तुतारी
संदेश रोष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ दया रे ।।३।।
भावार्थ :
No comments:
Post a Comment
आपको यह पोस्ट कैसी लगी कमेन्ट जरूर करें।