सायंकाळची शोभा भावार्थ / सरळ अर्थ
पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर.
भावार्थ (सरळ अर्थ) :
प्रस्तुत ओळी खोप्यामधी खोपा या कवितेमधून घेतलेली आहे. ज्यामध्ये कवींनी मनोहारी शब्दचित्र रेखाटले आहे सदर ओळींमध्ये कवी सांगित इच्छितो की पिवळसर, लालसर, कोवळे ऊन चहुकडे पसरले आहे. ओढ्यातील प्रवाही पाण्यावर ऊन पडल्यामुळे असे वाटते की ओढा जणू सोने लांब वाहून नेत आहे.
💧
💧
झाडांनी किति मुकुट घातले डोकिस सोनेरी
कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी!
भावार्थ (सरळ अर्थ) :
झाडांच्या शेंड्यावर सोनेरी किरणे पडल्यामुळे असे वाटते की झाडांनी डोक्यावर सोनेरी मुकुट घातले आहेत आणि रानाच्या गवतावर चहुकडे गुलाल पसरला आहे.
💢
💢
हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालीचे!
भावार्थ (सरळ अर्थ) :
हिरवेगार भाताचे शेत खूप सुंदर दिसते आहे. त्यामुळे ही हिरवी भाताची शेते जणू झोके घेणारे हिरवे गालीचेच आहेत.
😇
😇
सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे!
भावार्थ (सरळ अर्थ) :
सोनेरी, मखमली, चंदेरी निरनिराळ्या रंगाचे पंख फडफडवीत फुलपाखरे शेतावर भिरभिरत आहेत तसेच इंद्रधनुष्यांसारखे निरनिराळे रंगाचे पंख फडकवीत फुलपाखरू भिरभिरत आहे.
💜
💜
अशी अचल फुलपाखरे फुले साळिस जणु फुलती
साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती.
भावार्थ (सरळ अर्थ) :
फुलपाखरे भाताच्या शेतावर अशी भिरभिरत आहे की जणू ती भाताची फुलेच आहेत. तसेच, असे वाटतेकी भाताच्या शेतावर ही फुलपाखरांची फुले झोपलीत व पाळण्यात झुलत आहेत.
💪
💪-
झुळकन् सुळकन् इकडुन तिकडे किति दुसरी उडती!
हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती !
भावार्थ (सरळ अर्थ) :
सुळकन, इकडे-तिकडे उडणारी, झुळकन भिरभिरणारी ही कितीतरी दुसरी फुलपाखरे उडत आहेत. त्यांचे पंख म्हणजे जणू हिरे, माणके व पाचू गरगर गिरक्या घेत आहेत असे वाटते.
👄
👄
पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडिल तो 'सोन्याचा गोळा ?
भावार्थ (सरळ अर्थ) :
पक्षी दिवसभर चारापाणी घेऊन संध्याकाळच्या वेळी आता विसावा घेण्यासाठी झाडांवर गोळा झाले आहेत. आरामाची वेळ झाली आहे. हे सुंदर दृश्य निर्माण करणारा तो सोन्याचा गोळा म्हणजे सूर्य कुठे बुडाला हे कळत नाही.
----------------------------
No comments:
Post a Comment
आपको यह पोस्ट कैसी लगी कमेन्ट जरूर करें।